Saturday, July 26, 2025
Homeइचलकरंजीकिमान वेतनसह अन्य मागण्यांसाठी यंत्रमाग व्यवसायातील कामगारांचे आजपासून स्वाक्षरी मोहिम

किमान वेतनसह अन्य मागण्यांसाठी यंत्रमाग व्यवसायातील कामगारांचे आजपासून स्वाक्षरी मोहिम

यंत्रमाग कामगार फेडरेशन (सिटू ) आणि लालबावटा जनरल कामगार युनियन यांचेवतीने १ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे प्रचंड धरणे आंदोलन करणेचा निर्णय

मालेगाव येथे झालेल्या राज्यव्यापी यंत्रमाग कामगार अधिवेशनात घेतला होता, उद्या शुक्रवारपासून इचलकरंजी शहर आणि परिसरातील यंत्रमाग व्यवसायातील मागवला कोडियाले दिवाणजी, चेकर, मेंडर, हेल्पर, यहिणी कामगार, गारमेंट कामगार यांच्या सहा घेणेचा कार्यक्रम सुरु केला आहे.

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ताबडतोब करा, किमान वेतन कायद्याची मीरा सर्वाना ओळख द्या, कामगार अपघात मृत्यूला १० लाख रुपये या पेन्शन आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे, बाला इचलकरंजी आणि परिसरातील वरील कामगारांनी सह्या करून सहकार्य करायचे आहे आणि ३१ जुलै रोजी कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना आणि महालक्ष्मी रेल्वेने तिकीट काढून या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लालबावटा युनियनचे वतीने भरमा कांबळे यांनी केले आहे.

इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव आणि सोलापूर येथील यंत्रमाग कामगारांची प्रचंड पिळवणूक केली जात आहे. १२ तास कामामुळे कामगारांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. १२ तास काम करूनसुद्धा त्याला १९ हजार रुपये किमान वेतन मिळत नाही. पूर्वी ४ किंवा माग कामगार चालवत होता आता त्याला १०-१२-१४-१६ माग चालवावे लागत आहेत. कामगारांनी कायद्याप्रमाणे ८ तास काम आणि किमान वेतन मागायचे नाही का? आपल्या इचलकरंजी शहरांत यंत्राशयाय कोणताही कामगार तासापेक्षा जास्त तास काम करत नाही, मग यंत्रमाग कामगारानेच १२ तास काम का करावे ? तेव्हा या विरोधात लढ्यामध्ये मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -