Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलानं आईलाच संपवलं; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह...

धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलानं आईलाच संपवलं; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह…

गेल्या काही वर्षांमध्ये (Online Gaming) ऑनलाईन गेमिंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढलं असून, तरुणाई त्याच्या विळख्यात येताना दिसत आहे.

 

कोणी यामध्ये पैसे गमावले आहेत, कोणी मानसिक स्थैर्य तर कोणी याच गेमिंगमुळं गुन्हेगारी कृत्यांसाठी प्रवृत्त होतानासुद्धा दिसत आहेत. अशीच एक घटना घडली आहे वसईमध्ये, जिथं ऑनलाईन गेम खेळण्यासाठी एका मुलानं सावत्र आईचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 

का केली मुलानं आईची हत्या?

 

ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने एका तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वसईत उघडकीस आला. आरसीया खुसरो असं मृत महिलेचं नाव असून इम्रान खुसरो असं आरोपी मुलाचं नाव आहे.

 

इम्रानला होतं खेळाचं व्यसन?

 

ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात असलेल्या इम्रान खुसरो (32) याला मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन होतं. त्याला ‘व्हीआरपीओ’ नावाचा गेम खेळण्यासाठी 1 लाख 80 हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आरसीया हिच्याकडे मागितले. मात्र तिने पैसे दिले नाहीत. या रागात इम्रान शनिवारी बाभोळा येथील आरसीया यांच्या घरी गेला आणि तिथं त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोके आपटून आईचीच क्रूर हत्या केली.

 

पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांची साथ?

 

घडला सर्व प्रकार इम्रानेने वडिलांना सांगितला आणि त्यानंतर दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तातडीने विधी करत मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवलं होतं. या बाप लेकाने परिसरातीलच एका डॉक्टरकडून आरसीया नैसर्गिक रित्या मरण पावल्याचं प्रमाणपत्र घेतलं होतं.

 

मोलकरणीला संशय आला आणि…

 

इम्रान आणि त्याच्या वडिलांनी मृतदेह नष्ट करण्यासाठीच्या हालचाली केल्या खऱ्या मात्र. त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला घरातच रक्ताचे डाग दिसले आणि हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं आरोपी बाप लेकाला अटक केली. या गुन्ह्यात डॉक्टरचाही सहभाग दिसून येत असून पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत असल्याची माहिती तूर्तास समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -