Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगकॅनडात, 70 वर्षाची आई एकटी भारतात, भाडेकरूंनी गैरफायदा घेत केला मोठा कांड

कॅनडात, 70 वर्षाची आई एकटी भारतात, भाडेकरूंनी गैरफायदा घेत केला मोठा कांड

एका 70 वर्षाच्या विधवा आजीला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील नवीन पनवेल परिसरात ही महिला राहात होती. तिचा भाडेकरू आणि त्याच्या दोन नातेवाइकांनी मिळून या आजीला फसवले आहे.

 

त्यांनी तब्बल 47 लाख 79 हजार 285 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खंडेश्वर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी सचिन बाळकृष्ण मोरे, त्याची मुलगी लावण्या सचिन मोरे आणि त्याचे वडील बाळकृष्ण आत्माराम मोरे हे तिघे पीडित महिलेला फसवणुकीच्या उद्देशाने विश्वासात घेत राहत होते. हे तिघे महिला व तिच्या दिवंगत पतीच्या मालकीच्या सदनिकेत भाडेकरू म्हणून राहत होते. पीडित महिलेची मुलगी कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. शिवाय ही महिला एकटीच राहात होती. याचाच गैरफायदा आरोपींनी घेतला.

 

त्यांनी महिलेला सांगितले की, ते तिची मालमत्ता तिच्या मुलीच्या नावावर हस्तांतरित करण्यात मदत करतील. नगरपरिषदेच्या कागदपत्रांची नोंद अपडेट करतील. शिवाय तिच्या पतीच्या नावावर असलेल्या अनधिकृत दुकानाची नियमितता करून देतील, असं त्या महिलेला सांगितलं. त्यानुसार नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत महिलेकडून या कामांसाठी हप्त्यांनी पैसे घेतले गेले. एकूण रक्कम तब्बल ₹47,79,285 इतकी झाली. मात्र, कोणतेही काम पूर्ण न करता आरोपींनी वेळकाढूपणा केला. महिलेने वेळोवेळी कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली. अखेरीस, पैसे परत करण्याचंही नाकारलं.

 

अखेर त्रस्त झालेल्या पीडित महिलेने खांडेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिकारी म्हणाले, “सध्या या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, परंतु सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांचे पुरावे, पैसे कधी-कधी दिले गेले याबाबतचे तपशील आणि पीडित व आरोपींमध्ये झालेल्या संवादाचे पुरावे गोळा केले जात आहेत.” तसेच पोलिसांनी नागरिकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे की, भाडेकरूंशी व्यवहार करताना काळजी घ्या, आणि मालमत्तेशी संबंधित कोणतेही निर्णय किंवा आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -