कोल्हापूरची माधुरी हत्तीणी गुजरातमधील जामनगरला हलवली गेली. ती शिरोळ तालुक्यातील नंदनी येथील जैन मठाची महादेवी हत्तीण होती. यामुळे कोल्हापूरच्या नंदनी मठातील लोक भावुक झाले आणि मोठ्या संख्येने लोक निरोप देण्यासाठी जमले होते.
ते म्हणतात की, ती फक्त हत्तीण नव्हती तर त्यांच्या धार्मिक संस्कृतीचा भाग बनली होती. अनेक जैन धार्मिक विधींमध्ये भाग घेतला. श्रद्धेचे प्रतीक बनली. यानंतर आता या प्रकरणावर राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील नंदणी गावातून माधुरी अंबानींच्या ‘वंतारा’ हत्ती संवर्धन केंद्रात हस्तांतरित करण्याचा निर्णय दिला आहे.’वंतारा’ टीम वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह नंदनीमध्ये दाखल झाली. त्यानंतर महादेवीला त्यांच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी नंदनी मठात पूजा करून हत्तीला निरोप दिला. ते म्हणाले, आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. त्यामुळे कोणताही निषेध नाही, परंतु नागरिकांना त्रास होत आहे.
यानंतर यावर राजू शेट्टी यांनी मोठी माहिती दिली आहे. या घटनेचा निषेध दर्शवण्यासाठी राजू शेट्टी यांनी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, माधुरी हत्तीण परत करा, यासाठी रविवारी ३ जुलैला पदयात्रा काढण्यात येणार आहे. रविवार दि.३ ॲागस्ट रोजी सकाळी ५ वाजता नांदणी निशिधीका ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय एक दिवस ४५ किमीची पदयात्रा निघणार आहे, असं त्यांनी सांगितले आहे.
उच्च न्यायालयाने हत्तीला गुजरातमधील वंतारा येथे पाठविण्याचे निर्देश दिल्यानंतर नंदणी येथील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध नंदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर माधुरी हत्तीणीला वंतारा येथे पाठवण्यात आले.