Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाहरभजन सिंग खेळणार राजकीय 'इनिंग'? ; विविध पक्षांची ऑफर

हरभजन सिंग खेळणार राजकीय ‘इनिंग’? ; विविध पक्षांची ऑफर


भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घाेषणा शुक्रवारी ( २४ डिसेंबर) केली. लवकरच तो राजकीय इनिंग खेळण्याची चिन्हे आहेत. राजकारणाच्या पीचवर आता गोलंदाजी करण्याचे त्याचे मनसुबे असून कुठल्या राजकीय पक्षाकडून तो नवी इनिंग खेळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कालच हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हरभजन गेल्या काही वर्षांपासून खेळलेला नाही. तरीही तो क्रिकेटमध्ये होता. त्याने आपल्या निवृत्तीची औपचारिक घोषणा केली. हरभजनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांची भेट घेतली. त्यामुळे तो काँग्रेसमध्ये जाईल असे बोलले जात होते.

एका न्यूज एजन्सीशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, ‘ मी सर्व पक्षाच्या नेत्यांना ओळखतो. मी राजकारणात प्रवेश करणार असलो तर सर्वात आधी मीडियाला सांगेन. राजकारण असो अथवा अन्य कुठलाही दुसरा मार्ग मी स्वीकारला तर मी तो जाहीर करेन. पंजाबची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. अद्याप मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -