Sunday, August 10, 2025
Homeमहाराष्ट्रअसं कसं न सांगता निघून गेलात. रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाली चाकणकरांवर कोसळला दुःखाचा...

असं कसं न सांगता निघून गेलात. रक्षाबंधनाच्या दिवशी रुपाली चाकणकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर

क्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा लाडका मावस भाऊ बाळराजे माळी यांचे काल (९ ऑगस्ट) रात्री दुःखद निधन झाले

 

या अचानक घडलेल्या घटनेमुळे चाकणकर कुटुंबियांवर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर शोककळा पसरली आहे. बाळराजे यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

रुपाली चाकणकर यांच्या पोस्टमध्ये काय?

 

रूपाली चाकणकर यांनी आपल्या लाडक्या भावाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. रुपाली चाकणकर यांनी फेसबुकवर एका भावूक पोस्ट लिहिली आहे. “बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास….. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू.” असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच “माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप…” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -