Saturday, April 13, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात २ नवे रूग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात २ नवे रूग्ण

ताजी बातमी ऑनलाईन टीम


शनिवारी दिवसभरात कोरोनाचे २ नवे बाधित रुग्ण आढळन आले. ८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शनिवारी कोरोना बळींची संख्याही शून्यच आहे. जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ५५ आहे. शनिवारी जिल्ह्यातील ७०२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २ नवे कोरोना बाधित आढळून आले, या बाधितांमध्ये करवीर तालुक्यातील १ जण, तर कोल्हापूर महानगरपालीका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६ हजार ९२९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १ हजार ७५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ७९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ५५ इतकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -