Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयकओमायक्रॉनच्या परिस्थितीत बूस्टर डोसचा फायदा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

ओमायक्रॉनच्या परिस्थितीत बूस्टर डोसचा फायदा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे


कोरोना महामारीच्या लढाईचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री उशिरा केली. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन डोस (बूस्टर) देण्याची मोहीम 10 जानेवारीपासून सुरू करण्यात येईल, तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस देण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले.

डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. आपण १६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बूस्टर डोस देण्याची तसेच मुलांना लस देण्याची मागणी केली होती. आता ही मागणी मान्य झाली याचे समाधान आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.

पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -