Saturday, August 23, 2025
HomeBlogपंचगंगा नदी धोक्याजवळ, ७३ बंधारे पाण्याखाली :अनेक गावांचा संपर्क तुटला

पंचगंगा नदी धोक्याजवळ, ७३ बंधारे पाण्याखाली :अनेक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील प्रमुख पंचगंगा नदीचा जलस्तर सतत वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३४.०९ फूट इतकी नोंदवली गेली. नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या पातळी धोक्यापेक्षा कमी असली तरी पाण्याचा ओघ पाहता ती जलदगतीने वाढत आहे.

महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य : video

इचलकरंजी : पंचगंगेची पातळी ५५ फुटांवर; जुना पूल बंद

पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा–कोल्हापूर महामार्गावरील मांडूकली येथे पाणी साचल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोर्टाच्या चौकात तसेच कळे परिसरात सुरक्षेसाठी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. याशिवाय कोल्हापूर–राजापूर राज्य मार्गावर बाजारभोगाव येथे पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद करावी लागली आहे.

राहुल आवाडे युवा सेनेची 3.11 लाखाची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली 

‘स्मार्ट मीटर’बाबत शासनाकडून न्यायालयात महत्वाची माहिती, ‘आता प्रीपेड.’

याचदरम्यान, अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा महत्त्वाचा मार्ग देखील बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने माती आणि खडक हटवण्याचे काम सुरू केले असून, दुपारपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने खरीप पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. अनेक गावांचा संपर्क खंडित झाला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले : व्हिडिओ पहा

पूरपरिस्थिती पाहता जिल्हा प्रशासन, महसूल व पोलीस विभाग सतत निरीक्षण करत आहेत. आपत्कालीन मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -