Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगचिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव निघालेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडकेत पाच जण ठार झाले. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षामागून येणाऱ्या ट्रक व मोटार यांच्यामध्ये सापडून रिक्षाचा चक्काचूर झाला.

या अपघातात रिक्षाचालक, प्रवासी पती-पत्नी व त्यांचा चार वर्षांचा चिमुकला, मोटारचालक असे पाच जण जागीच ठार झाले. ही घटना पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीसमोरील कॅनॉलवर सोमवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुकाच हादरला. या अपघातप्रकरणी मोटारचालकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालक इब्राहिम इस्माईल लोणे (वय ६२, रा. नुराणी मोहल्ला, पिंपळी), मोटारचालक आसिफ हाकीमुद्दीन सैफी (२८, डेहराडून, उत्तराखंड), रिक्षातील प्रवासी नियाज महंमद हुसेन सय्यद (५०), शबाना नियाज सय्यद (४०) व हैदर नियाज सय्यद (४, सर्व रा. पर्वती, पुणे) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अपघाताची फिर्याद अमोल पांडुरंग कदम (खेर्डी विकासवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलिसात दिली.

नियाज सय्यद व शबाना सय्यद यांचा मुलगा पिंपळी येथील मदरशामध्ये शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचे आई-वडील व भाऊ हैदर असे तिघे आले होते. त्याची भेट झाल्यानंतर ते पुणे येथे परतीच्या प्रवासाला निघाले होते. सय्यद कुटुंब इब्राहिम लोणे यांच्या रिक्षामधून सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पिंपळी ते रेल्वेस्टेशन असा प्रवास करत होते. त्याचदरम्यान, चिपळूण ते कऱ्हाड दिशेने आसिफ सैफी हा भरधाव मोटार चालवत समोरून आला. त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक देत फरफटत नेले. रिक्षाच्या मागे ट्रक होता. त्यामुळे ती रिक्षा ट्रकवर आदळली. यामध्ये रिक्षाचा चालकासह तिन्ही प्रवासी, मोटारचालकही ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मोटार हरियाना राज्यातील आहे. अपघातातील मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणले. या घटनेमुळे चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी मंगळवारी सकाळी सय्यद कुटुंबातील पती-पत्नी व मुलगा तसेच इब्राहिम लोणे यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -