Monday, December 23, 2024
Homeसांगलीसांगली : महागड्या खर्चाची द्राक्षे झाली मातीमोल

सांगली : महागड्या खर्चाची द्राक्षे झाली मातीमोल


पराकोटीची प्रतिकूल परिस्थिती आणि मोठा खर्च करून पिकवलेली द्राक्षे आता मातीमोल दराने विकली जात आहेत. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेतला आहे. द्राक्ष भाव ठरवण्यासाठी नाशिक येथे उत्पादकांचा मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्ये द्राक्ष दर ठरविण्यात आले. त्या धर्तीवर जिल्ह्यात द्राक्षउत्पादकांचा मेळावा घ्यावा आणि दर निश्‍चिती करून द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत.

आता द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. सातत्याने येणार्‍या विविध अडचणींचा सामना करून द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे. प्रामुख्याने महाग झालेली खते व औषधे, वाढलेले मजुरीचे दर, अत्यंत प्रतिकूल हवामान या गोष्टींमुळे द्राक्ष शेती नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पुढाकार घेऊन द्राक्ष विक्रीसाठी दर निश्चितीसाठी बैठक घेतली. लगेचच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे द्राक्षउत्पादकांचा मेळावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -