भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळावर अखेर पावासने पाणी फिरवले आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सकाळी खेळाला सुरुवात होण्याआधी सेंच्युरियनमध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे सामना विलंबाने सुरु होईल असे वाटले. पाऊस थांबल्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सामना सुरु करण्याआधी मैदानाचे निरीक्षण करायचेही ठरवले. पण अधन-मधन पावसाचा खेळ सुरुच होता. अखेर पाऊस थांबणार नसल्याची चिन्हे दिसल्यानंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. आज दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरु शकले नाहीत. त्यामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. आता कसोटीचे फक्त तीन दिवस उरले आहेत.
काल पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवलं होतं. दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या. सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावल असून तो (122) धावांवरुन उद्या डाव पुढे सुरु करेल. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणे साथ देईल. रहाणे (40) धावांवर नाबाद आहे.
मयांक अग्रवाल आणि राहुलने काल पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. त्यांच्या दमदार सलामीमुळे भारताला पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवता आलं. मयांकला (६०) धावांवर निगीडीने पायचीत केले. कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो (35) धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता आल्यापावली माघारी परतला.
हे तिन्ही विकेट निगीडीने घेतले. निगीडी वगळता दक्षिण आफ्रिकेच्या एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी दाद दिली नाही. आज मोठी धावसंख्या उभारुन दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलण्याचे भारताचे लक्ष्य होते. भारतासाठी दौऱ्याची सुरुवात समाधानकारक झाली आहे. 29 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भारत मैदानात उतरला आहे.
India vs South Africa : पावसाच्या बॅटिंगमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -