Friday, June 21, 2024
Homeआरोग्यविषयकलहान मुलांसाठी कोवॅक्सिन लस : नोंदणी कशी करावी?

लहान मुलांसाठी कोवॅक्सिन लस : नोंदणी कशी करावी?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारतात ३ जानेवारी २०२१ पासून भारत बायोटेकचे कोवॅक्सिन लस १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने रविवार (दि. २६) रोजी १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मंजूरी दिली होती. ही सध्या भारतात उपलब्ध असलेली एकमेव लस आहे.

कोविड-१९ च्या ( कोवॅक्सिन लस ) लसीकरणासाठी १५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व मुले पात्र आहेत. याचा अर्थ असा की, २००७ पूर्वी जन्मलेली सर्व मुले कोविड-१९ विरूद्धच्या लसीकरण करण्यास पात्र ठरली आहेत.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार असले तरी, १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप काहीही पुष्टी झालेली नाही. कोवॅक्सिनच्या बाबतीत, लसीचे दोन डोस दिले जातील. तथापि, दुसरा डोस हा २० दिवसांच्या कमी कालावधीत दिला जाणार आहे. या डोससाठी जानेवारीपासून पालक त्यांच्या मुलांसाठी नोंदणी करू शकतात.

१) १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्वजण Co-WIN (कोवॅक्सिन) वर नोंदणी करू शकतात.
२) लाभार्थी Co-WIN वर अस्तित्वात असलेल्या खात्याद्वारे ऑनलाइन स्वयं-नोंदणी करू शकतात. किंवा युनिक मोबाईल नंबरद्वारे नवीन खाते तयार करून नोंदणी देखील करू शकतात, ही सुविधा सध्या सर्व पात्र नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
३) अशा लाभार्थींना व्हेरिफायर/ लसीकरण करणार्‍याद्वारे सोयीस्कर नोंदणी पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाऊ शकते.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -