Friday, February 13, 2026
Homeमहाराष्ट्रवरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

वरिष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

तुम्हाला माहिती आहे का की भारत सरकारने ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या वृद्धांना लक्षात घेऊन एक विशेष आयुष्मान(Ayushman) वय वंदना कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना केवळ स्वस्तच नाही तर पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. प्रथम हे आयुष्मान वय वंदना कार्ड काय आहे आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकते ते जाणून घेऊया. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

 

खरं तर हे कार्ड आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा एक भाग आहे आणि याअंतर्गत, ७० वर्षे किंवा त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय कव्हर दिले जात आहे. तुम्ही ते केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच नाही तर सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्येदेखील वापरू शकता.

 

मिळालेल्या माहिनुसार, या योजनेत २७ वैद्यकीय विशेषता आणि सुमारे १,९६१ उपचार आणि प्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नाही तर यामध्ये शस्त्रक्रिया, आयसीयू काळजी, निदान चाचण्या आणि इतर अनेक गंभीर आजारांवर उपचारदेखील समाविष्ट आहेत.

 

 

 

आयुष्मान(Ayushman) वय वंदना कार्डचे फायदे मिळविण्यासाठी तुमचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. तुम्ही तुमच्या वयाची ७० वर्ष पूर्ण केली असतील तर तुम्ही या कार्डसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची उत्पन्न मर्यादा, सामाजिक स्थिती किंवा आर्थिक पात्रतेची कोणतीही अट नाही. यामुळे वरिष्ठ नागरिकांना फायदा मिळू शकतो. या कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. नक्की कशा स्पेप्स वापरून तुम्ही यासाठी अर्ज करून शकता जाणून घेऊया

 

सर्वप्रथम Google Play Store वरून Ayushman App डाउनलोड करा यानंतर, App वर जा आणि Beneficiary वा Operator म्हणून लॉगिन करा आता मोबाईल नंबर, कॅप्चा आणि प्रमाणीकरण पद्धत निवडायानंतर, तुमचे राज्य आणि आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा जर नाव यादीत दिसत नसेल, तर OTP आधारित eKYC पूर्ण करातुमची वैयक्तिक माहिती आणि घोषणापत्र अर्थात डिक्लेरेशन फॉर्मदेखील भरा यानंतर, तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTP ने ते व्हेरिफाय करा. हे केल्यानंतर, श्रेणी आणि पिन कोड प्रविष्ट कराशक्य असल्यास, त्यात कुटुंबातील सदस्यांनादेखील जोडातपशील पडताळणी आणि मंजुरीनंतर, तुम्हाला तुमचे कार्ड मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -