Saturday, September 6, 2025
Homeब्रेकिंगराज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात खटाखट ₹२००० जमा होण्यास सुरुवात

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात खटाखट ₹२००० जमा होण्यास सुरुवात

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्यात खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता म्हणजेच २००० रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा (Namo Shetkari Yojana 7th Installment)

 

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याच्या लाभ वितरीत करण्यासाठी कृषी विभागाने काल निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

 

नमो शेतकरी योजनेचा निधी वितरीत (Namo Shetkari Yojana Fund Transfer)

 

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळतो. त्यासाठी १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार आहे.

 

केंद्राच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. याचसोबत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गतदेखील शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण १२००० रुपये मिळतात. नमो शेतकरी योजनेत आता शेतकऱ्यांना सातवा हप्ता देण्यात येणार आहे.

 

या शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजनेचा लाभ (These Farmers Will Get 2000 Rupees)

 

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, सातव्या हप्त्यांमध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ पर्यंतचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. जे शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेतात. त्यांना सर्वांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दर वर्षी मिळतात ६ हजार रुपये; नमो शेतकरी योजना आहे तरी काय?

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -