ताजी बातमी ऑनलाईन टीम
सेंच्युरियन कसोटीचा दुसरा दिवस पावसामुळे वाहून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. येथे सकाळपासून ढग स्वच्छ आहेत आणि खेळ वेळेवर सुरू झाला आहे. आता टीम इंडियाची नजर पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यावर आहे. टीम इंडियाची धावसंख्या ९४ षटकांत ४ बाद २७८ आहे.
भारताची चौथी विकेट पडली आहे. लोकेश राहुल १२३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कागिसो रबाडाने त्याची विकेट घेतली तर विकेटच्या मागे क्विंटन डीकॉकने त्याचा झेलबाद पकडला. रबाडाच्या शॉर्ट बॉलवर राहुलने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हज स्पर्शकरून विकेटच्या मागे गेला. यष्टीरक्षक डीकॉकने कसही चूक न करता झेल पकडला.
कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाला. सेंच्युरियन येथे सोमवारी (दि. २७) दिवसभर पाऊस पडला, त्यामुळे एकही षटक टाकले गेले नाही आणि पंचांनी त्या दिवसाचा खेळ रद्द केला. दुसऱ्या दिवसाची उणीव भरून काढण्यासाठी तिसऱ्या दिवशी एकूण ९८ षटकांचा खेळ होईल अशी माहिती मिळत आहे.
INDvsSA Test Day 3 : रबाडाकडून राहुलची शिकार, भारताला चौथा झटका
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -