ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 7th September 2025) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
आजचा दिवस मेष राशींसाठी ठिकठाक आहे. तुमची आर्थिक स्थिती आता मजबूत होण्याच्या दिशेने आहे. कमाईचा वेगळा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला आजच्या दिवशी यश मिळेल. घरात सुख मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेमाचं संतुलन राखलं जाईल. आज तुम्हाला अत्यंत चविष्ट भोजनाचा अस्वाद घेता येणार आहे. वाहने जपून चालवा. नामस्मरण करा. घराच्याबाहेर पडणं टाळा.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आज तुमचा ओढा धार्मिक आणि सामाजिक कामाकडे अधिक असणार आहे. आज तुम्हाला नातेवाईकांच्या मदतीची गरज भासणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा मिळणार आहे. यात्रेला जाण्याचा योगही संभवतो. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज बरीच खरेदी होणार आहे. त्यामुळे तुमचा पैसा खर्च होईल. पण कोणतीही जोखीम घेऊ नका. कुणाचंही मन दुखावू नका. प्रेयसीवर रागवल्याचे परिणाम जाणवतील. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
आज तुम्हाला धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यातही तुमचा पुढाकार असेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठं सहकार्य मिळणार आहे. सुट्टीच्या दिवशीही तुम्हाला घरून काम करावं लागणार आहे. तुमच्या ग्रहाच्या संकेतानुसार, आज तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटायला जाण्याची शक्यता आहे. तसेच एखाद्या जवळच्या व्यक्तीला मदत करावी लागणार आहे. आज सुट्टीच्या दिवशी विविध कार्यक्रम असल्याने त्यातच तुमचा दिवस जाणार आहे. त्यामुळे तब्येतीची कुरबूर जाणवू शकते.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. आज महत्त्वाची कामे दुपारच्या आधीच पूर्ण करा. दुपारनंतर अचानक वेगळी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुले तुमचे कामकाज आणि योजना बदलू शकतात. त्यामुळे दुपारच्या आधी जेवढी कामे निपटता येईल तेवढी निपटा. आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक खर्चिक असेल. प्रवासाला जाताना सामानकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील स्थिती सामान्य राहील. प्रेयसीला वेळ द्या. घरात बायकोशी कुरबूर होण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
तुम्हाला आज तुमच्या बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर लाभ मिळवता येणार आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळणार आहे. विजेची उपकरणे तयार करण्याचं काम करणाऱ्यांना आज आर्थिक फायदा होणार आहे. तुमचे वडील आजारी असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या मित्राशी अचानक भेट होऊ शकते. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरी आज पूजेचा बेत आखाल. गावाकडे जाण्याचा योग आहे.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
आज तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. शत्रूला संधी मिळेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. आज आरोग्याची कटकट उद्भवू शकते. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा आज फायदा होताना दिसत आहे. तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाकडे थोडे लक्ष द्या. प्रेम आणि सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न करा. शिक्षणासाठी तुम्हाला आजचा दिवस चांगला आहे.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
आज एखाद्या जवळच्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधाना वाटेल. तुमच्या मनात आज रचनात्मक विचार असणार आहेत. तुम्ही कलाकार असाल तर आजचा दिवस तुमचाच आहे. लव्ह लाइफमध्ये प्रेयसीसोबत रोमांटिक वेळ घालवाल. पण खर्चावर ताबा ठेवा. नाही तर कंगाल होऊन जाल. भावनिक झाल्यावर तुमचं बजेट आवाक्याच्या बाहेर जातं.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
आज सुख आणि आनंदाचा मिलाफ होणारर आहे. त्यामुळे तुमचा दिवस अत्यंत सुखात जाणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. आज एखादा धाडसी निर्णय घ्याल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांना आज कमाईची मोठी संधी आहे. पण तुमच्यावर जळणाऱ्यांपासून सावध राहा. शेजाऱ्याशी कडाक्याचे भांडण होण्याची शक्यता आहे. भांडणावेळी जीभेवर नियंत्रण ठेवा. नाही तर गैरसमज वाढण्याची शक्यता आहे.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी यथातथाच राहील. प्रवासाचा योग आहे, पण सावध राहणं आवश्यक आहे. दुपारनंतर उत्साहाच्या भरात जोखमीचं काम अंगावर घेऊ नका. आज तुम्हाला कुटुंबीयांची पुरेपूर साथ मिळेल. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे. आजच्या दिवशी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोटाशी संबंधित विकार जाणवण्याची शक्यता आहे. लव्ह लाइफमध्ये प्रेयसीकडून सहकार्य मिळेल. लव्ह लाइफ पुढे नेण्यासाठी प्लान तयार करा. आजचा दिवस अधिक खर्चिक होऊ शकतो.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यताही आहे. खासकरून बिझनेस करणाऱ्यांना आज कमाईची मोठी संधी आहे. तुमचं आरोग्य ठिकठाक राहील. प्रेयसीसोबत ताळमेळ राखा. नाही तर लेण्याचे देणे पडतील. शेजारीण बाईशी कडाक्याचं भांडण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वत:ला आवरा. अपशब्द बोलणं टाळा. घराच्या बाहेर पडताना सावध राहा. आज मित्रांना भेटणं टाळा. दारूचं व्यसन जितक्या लवकर सोडता येईल तितक्या लवकर सोडा.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
आरोग्याची काळजी घ्यायला लावणारा दिवस आहे. आज खर्चावरही नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनिकतेचा फायदा उचलणारे लोक आज तुम्हाला भेटतील. पण तुम्ही कुणावरही डोळे लावून विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकच सजग राहावं लागणार आहे. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. प्रेयसीशी वाद करणं टाळा, नाहीतर आज विचका होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळावर जाण्याची संधी मिळाली तर आवश्य जा. बायकोशीही वाद करणं टाळा. आईचा सल्ला मानला तर तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
तुमचा दिवस खर्चाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. नको तो खर्च करावा लागणार आहे. धर्मकार्यात रुची वाढेल. मीन राशीच्या लोकांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या बुद्धी चातुर्याने समोरच्याला मात द्याल. वरिष्ठांचा आदर सन्मान करा. बायकोसोबत बिनसण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या प्रकरणात नाक खुपसू नका. नाही तर डोक्याला ताप होईल. गावाला जाण्याचा बेत आहे. वाहन खरेदीचा योग आहे. बहीण घरी येण्याची शक्यता आहे.