Wednesday, September 10, 2025
Homeब्रेकिंग1 लाखाचे झाले 12 कोटी, 5 वर्षांत करोडपती बनवणाऱ्या बाहुबली स्टॉकची चर्चा!

1 लाखाचे झाले 12 कोटी, 5 वर्षांत करोडपती बनवणाऱ्या बाहुबली स्टॉकची चर्चा!

शेअर बाजार हे असे क्षेत्र आहे जिथे गुंतवणूकदारावर एका क्षणात पैशांची बरसात होते. तर कधीकधी शेअर बाजारात माणूस कंगालही होतो. म्हणूनच या क्षेत्रात व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याचा धोका टाळता येतो. शोध घेतल्यास शेअर बाजारात काही समाभाग असे आहेत ज्यात गुंतवणूक केल्यास पैसे वाढण्याची हमखास शक्यता असते. सध्या अशाच एका शेअरची चर्चा होत आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षांत करोडपती केले आहे.

 

5 वर्षांत गुंतवणूकदार झाले कोट्यधीश

या शेअरचे नाव Hitachi Energy India असे आहे. या शेअरने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस असा परतावा दिलेला आहे. 2020 साली हा शेअर फक्त 15 रुपयांवर होता. म्हणजेच 2020 साली एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज या गुंतवणूकदाराच्या एक लाख रुपयांचे मूल्य तब्बल 12.60 कोटी रुपये झाले असते. म्हणजेच पाच वर्षांत गुंतवणूकदार थेट कोट्याधीश झाला असता. पाच वर्षात Hitachi Energy India हा शेअर तब्बल 12500 पटीने वाढला आहे. अशा पद्धतीचा परतावा फारच कमी शेअर देतात.

 

सध्या Hitachi Energy India शेअरची स्थिती काय?

सध्या Hitachi Energy India हा शेअर मुंबई शेअर बाजारावर आहे. सध्या या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 19877 रुपये आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 64 टक्क्यांनी परतावा दिलेला आहे. या वर्षात Hitachi Energy India या शेअरचे मूल्य 25 टक्क्यांनी वाढले आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरचे मूल्य फक्त 15 रुपये होते.

 

शेअर बाजारात गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?

शेअर बाजारात गुंतवणूक करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. काही शेअर अल्पावधीत तुम्हाला भरपूर परतावा देतात. पण हाच शेअर तुम्हाला एका क्षणात कंगालही करू शकतो. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य तो अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करूनच गुंतवणूक करायला हवी, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -