Wednesday, September 10, 2025
Homeक्रीडासाखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर मैदानात उतरला, अर्ध्या संघाला पाठवलं तंबूत

साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अर्जुन तेंडुलकर मैदानात उतरला, अर्ध्या संघाला पाठवलं तंबूत

अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप सोडली आहे. सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनतंर अर्जुन तेंडुलकर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली आहे. आयपीएल स्पर्धेनंतर थेट आता देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहे. आयपीएलच्या मागच्या पर्वात अर्जुन तेंडुलकरला काही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. संपूर्ण सिझन त्याने बेंचवर बसून काढला. त्यानंतर सरावादरम्यान दुखापत झाली आणि उर्वरित स्पर्धेला मुकावं लागलं होतं. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटशिवाय दुसरा पर्याय नाही. आता अर्जुन तेंडुलकर फिट अँड फाईन आहे. अर्जुन तेंडुलकर कर्नाटकातील प्रसिद्ध डॉक्टर केटी मेमोरियल स्पर्धेत गोव्याकडून खेळत आहे. या सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली. अर्जुन तेंडुलकरने पाच विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. त्याने 36 धावा केल्या.

 

विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच चेंडूवर विकेट काढली. त्यानंतर सामना संपेपर्यंत त्याच्या नावावर पाच विकेट घेण्यास यशस्वी झाला. अर्जुन तेंडुलकरची खास गोष्ट म्हणजे त्याने शॉर्ट बॉलने फलंदाजांना त्रास देत होता आणि त्याच चेंडूवर विकेट देखील मिळाली. अर्जुन तेंडुलकरला ‘लेडी लक’ नशि‍बाचं दार खुलं झाली अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणारआहे. दोघांनीही 13 ऑगस्ट रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.

 

25 वर्षीय अर्जुनची क्रिकेट कारकिर्द अजूनही आकार घेत आहे. त्याच्याकडून क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत.डावखुरा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीचा फलंदाज म्हणून त्याने 2020-21 पर्वात मुंबईकडून आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. पण अधिक संधीच्या मिळाव्या यासाठी गोव्याकडून खेळण्यास सुरुवात केली.अर्जुन तेंडुलकर आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळला आहे. यात त्याने 37 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच लिस्ट ए मधील 18 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 मध्ये त्याच्या नावावर 27 विकेट्स आहेत. तर प्रथम श्रेणी सामन्यात शतकही ठोकले आहे. आयपीएल 2023 मध्ये, अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून वानखेडे येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. पण फार काही करू शकला नाही. त्याने पाच सामन्यात 114 धावा देत 3 गडी बाद केले. तर एकदा फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा एका षटकारासह 13 धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -