रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी येथील वेताळपेठ, लालनगर परिसरात दहशत माजवत आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत यश अशोक बनसोडे आणि रोहित सनी कांबळे (दोघे रा. कुहरोग वसाहत) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचायत साहिल सिकदर नदाफ (रा. वेताळपेठ) याने फिर्याद दिली आहे.
बाबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्रीच्या सुमारास रोहित कांबळे व यश बनसोडे या दोघांनी वेताळपेठ परिसरात दहशत माजवत फिर्यादी साहिल नदाफ याने दुकानासमोर उभी केलेल्या ज्युपिटर मोपेड (क्र. एमएच ०९ जीजी ७५५८) ची तोडफोड केली. तसेच बाजुसच असलेल्या सल्लाउद्दीन नेजकर यांची मोटरमायकल (क्र. एमएच ०९ एडी ३९९३) आणि परिसरातीलच शौकत नदाफ बांच्या रिक्षा (क्र. एमएच ०७ डी ७५४) च्या काचा फोडून नुकसान केले. शिवाय दारात लावलेल्या एकाच्या सावकलचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नागरिक जमत असल्याचे पाहताच संशयीतांनी घटनास्थळावरून पळ काढला. बनसोडे व कांबळे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.