आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना आधार देण्यासाठी, त्यांना स्वत:च्या पायावर उभ राहण्यास मदत करण्यासाठी साधारण वर्षभरापूर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (MukhyaMantri Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. महायुतीने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना 13 महिने हे पैसे मिळाले आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची महिलांना अजून वाटच पहावी लागत आहे. ऑगस्ट संपला, सप्टेंबर उजाडून 11 दिवस झाले तरी लाभार्थी महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत.
मात्र आता ऑगस्टच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणीचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले जाणार आहेत. आणि त्यालाठी महिला व बालविकास विभागाल तब्बल 344.30 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच त्यांचे मागच्या महिन्याचे 1500 रुपये मिळतील, मात्र ते नेमके कधी जमा होणार याची अधकृत तारखी अद्याप घोषित झालेली नाही.
आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत.तर आता ऑगस्टचे पैसे मिळाल्यावर त्यांच्या खात्यात 14 व्या महिन्याचेही पैसे जमा होतील. महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यासंदर्भातील शासन निर्णय काल 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये दिले जातात. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 13 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत.
लाडक्या बहीण योजनेत 3 हजार लाभार्थ्यांची घुसखोरी
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून ती चर्चेत असतेच. पण त्यात गैरप्रकार होण्याचे, घुसखोरीचेही प्रमाण खूप आहे.याचसंदर्भात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. यवतमाळमध्ये लाडक्या बहीण योजनेत 3 हजार 761 लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेकींनी योजनेचा लाभ घेतला. तसेच ही योडना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी असतानाही, काही घरातील 65 पेक्षा जास्त वयाच्या महिलादेखील योजनेचे पैसे लाटकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. आयटी विभागाने निकषाला डावलणाऱ्यांचा अहवाल सादर केला आहे. आता नियम मोडणाऱ्या, गैरप्रकार करणाऱ्यांचा हप्ता थांबवण्यात येणार असून त्यांच्यार कारवाईही करण्यात येणार आहे.