इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)फाईल करण्याची शेवटची तारीख येण्यास केवल तीन दिवस शिल्लक राहिले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 ( असेसमेंट इयर 2025-26)साठी पर्सनल टॅक्स पेयर्सना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रिटर्न भरणे गरजेचे आहे. ज्या करदात्यांनी आतापर्यंत आपला रिटर्न भरलेला नाही. त्यासाठी ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही 15 सप्टेंबर पर्यंत आयटीआर जर नाही भरला तर काय होणार ? चला पाहूयात काय आहेत पर्याय…
वेळेवर रिटर्न न भरल्याने करदात्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा आणि पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. वेळेवर रिटर्न भरल्यास न केवळ दंडापासून सुटका होते, तसेच प्रोसेसिंग आणि रिफंड देखील लवकर मिळू शकतो.
वेळेवर आयटीआर न भरल्यास का होते ?
1. लेट फायलिंगवर दंड : जर तुमची डेडलाईन चुकली तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत बिलेटेड रिटर्न फाईल करु शकतो., परंतू दंड भरावा लागू शकतो. हा दंड उत्पन्नाच्या आधारे लावला जातो. 5 लाखाहून अधिक उत्पन्न असल्यानंतर 5,000 रुपये आणि 5,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यानंतर 1,000 रुपये दंड लावला जातो.
2.रिफंड उशीरा मिळतो : ज्या लोकांना टॅक्स रिफंड मिळत असतो त्यांना ही रक्कम उशीराने मिळते.
3. लोन आणि व्हीसावर परिणाम : ITR स्टेटस अनेकदा लोन मंजूरी आणि परदेश प्रवलास व्हीसा प्रक्रियेत बाधा आणते. न भरल्यास अडचणी वाढू शकतात.
4.व्याजाचे ओझे : जर तुमच्यावरील टॅक्स प्रलंबित आहे तर वेळेवर ITR फाईल केला नाही तर तुम्हाला त्यावर अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.
आयटीआर फायलिंगसाठी आवश्यक कागदपत्रे
आटीआयर फाईल करण्यासाठी तुम्हा आधी एम्प्लॉयरकडून फॉर्म 16, फॉर्म 26AS आणि AIS,पॅन आणि आधारकार्ड, गुंतवणूकीचे पुरावे,उदा.बँक एफडी, पीपीएफ, होम लोन व्याज सर्टीफिकेट्स आणि विमा प्रिमियमच्या पावत्या सोबत ठेवा. म्हणजे अखेरच्या क्षणी कोणतीही अडचण येणार नाही.
फाईल करु शकता बिलेटेड रिटर्न
मनी कंट्रोलशी बोलताना टॅक्स मॅनेजरचे फाऊंडर आणि सीईओ दीपक जैन यांनी सांगितले की सकाळपासूनच एन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि टॅक्स इन्फॉर्मेशन स्टेटमेंट इम्पोर्ट करताना अडचणी येत आहेत. आमच्या कॉल सेंटर आणि एडव्हाजर्सना लागोपाठ कॉल येत आहे. त्यांची एकच चिंता आहे की जर 15 सप्टेंबरपर्यंत रिटर्न फाईल केले नाही तर काय करता येते? परंतू यासाठी किती दंड भरावा लागेल ?