मुंबईचा राजा रोहित शर्मा… भारतीय क्रिकेट संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा याचा चाहतावर्ग मोठा आहे.. रोहितची एक झलक बघायला चाहते मोठ्या प्रमाणावर स्टेडियम मध्ये गर्दी करतात,… एवढच नव्हे तर रोहित जिथे जिथे जातो, तिथे तिथे त्याच्यासोबत चाहत्यांचा मोठा गराडा असतो. मात्र रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे… मागील अनेक दिवसांपासून रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. रोहितच्या निवृत्तीबाबत सुद्धा सतत चर्चा सुरु असतात. याच दरम्यान, रोहित शर्माने एक नवा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. होय मी पुन्हा आलोय, आणि मला खूप छान वाटतंय असं म्हणत रोहित शर्माने प्रॅक्टिस करत असतानाच विडिओ शेअर केला आहे.
काय आहे रोहितच्या व्हिडिओत? Rohit Sharma
खरं तर रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. अलिकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हिटमॅनच्या एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीबद्दल दावा करण्यात आला होता. मात्र आता थेट व्हिडिओच शेअर करत रोहितने या दावा फेटाळून लावला आहे.इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसतोय कि, मी पुन्हा आलोय आणि मला इथे बरे वाटत आहे…. यावेळी रोहित सराव करताना दिसतोय आणि वेगवेगळे फटके मारताना दिसतोय… या व्हिडिओच्या माध्यमातून रोहितने निवृत्तीच्या चर्चाना पूर्ण विराम दिलाय. तसेच अजूनही माझ्यात भरपूर क्रिकेट शिल्लक आहे, अजूनही मी खेळू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न रोहित शर्माने केला आहे.
दरम्यान, टी20 वर्ल्डकप 2024 जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी20 क्रिकेटला अलविदा केला होता. 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधूनही त्याने निवृत्ती घेतली होती. मात्र आता वनडे फॉरमॅटमध्ये रोहित पूर्ण ताकदीने खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहितचे पुनरागमन होऊ शकते. त्याने शेवटचा भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद जिंकले होते. रोहितने (Rohit Sharma) न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ७६ धावा केल्या. त्याच्या खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर रोहित आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर दिसलाच नाही.. अखेर त्याने आपला प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला आहे. रोहितने असच खेळत राहावे, २०२७ च्या विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करावे आणि भारताला वर्ल्ड कप जिंकवून द्यावा अशी इच्छा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.