Tuesday, September 16, 2025
Homeयोजनालाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता; सरकारने घेतला मोठा निर्णय, खात्यात खटाखटा 1500 रुपये जमा...

लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता; सरकारने घेतला मोठा निर्णय, खात्यात खटाखटा 1500 रुपये जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये.

 

हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, राज्य सरकारकडून निधी वितरित केला आहे. त्यामुळे आता कोणत्याहीक्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. या निधी वितरणाच्या संदर्भात राज्य सरकारने जीआर सुद्धा काढला आहे.

 

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी

 

लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा निधी मिळावा यासाठी राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी 344.30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणाच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात…

 

शासन निर्णय जशाचा तसा

 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहrण” योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-3, 2235-सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाजकल्याण, 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, (02) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, (02) (01) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (कार्यक्रम) 31-सहायक अनुदाने (वेतनेतर) (2235डी767) या लेखाशिर्षाखाली रु. 3960.00 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे.

वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि07.04.2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे.

त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी (2235डी767) या लेखाशिर्षाखाली रु. 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव, महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पिय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

 

सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. सदर वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पध्दतीने काटकसरीच्या उपाययोजना करुन खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, समाजकल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवणेबाबत दक्षता घ्यावी.

 

विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थीकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या सजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलाना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेव्दारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -