Tuesday, September 16, 2025
Homeमहाराष्ट्रफिनिक्स मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न

फिनिक्स मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न

फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

 

आयटी कंपनीत काम करणाऱ्या मनोज कदम नावाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

 

प्रोमोशनच्या आमिषाने महिलेसोबत अश्लील वागणूक करून बलात्काराचा प्रयत्न

 

वाकड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला

 

परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली

 

पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. मॉलमधील सुरक्षा रक्षक महिलेवर आयटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. प्रोमोशनची भूलथाप देत त्यानं महिलेवर जबरदस्ती केली. या प्रकरणी महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत होती. तर, मनोज धोंडीराम कदम असे आरोपीचे नाव असून, ते आयटी ऑफिसमधीस कर्मचारी असल्याची माहिती आहे.

 

पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची ओळख मॉलमध्येच झाली. मात्र, नंतर आरोपीनं महिलेसोबत अश्लील वागणुकीला सुरूवात केली. आरोपीनं महिलेसमोर एक ऑफर ठेवली. ‘तुला कोणती पोस्टिंग हवी आहे, मला सांग’, असं म्हणत त्यानं महिलेसोबत अश्लील वर्तवणुक केली.

 

नंतर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच वाकड पोलिसांना सगळी माहिती दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तसेच आरोपी कर्मचारी कदम यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

 

वाकड पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 351 (2), 351 (3) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -