Saturday, September 20, 2025
Homeमहाराष्ट्रझोमॅटोवरुन मागवली बिर्याणी, खाण्यासाठी सुरुवात करताच दिसले असे काही की…

झोमॅटोवरुन मागवली बिर्याणी, खाण्यासाठी सुरुवात करताच दिसले असे काही की…

ऑनलाईन फूड सेवेमुळे हवे ते पदार्थ घरबसल्या मागवता येतात. परंतू अलिकडे अनेक घटना अशा ऑनलाईन मागवलेल्या जेवणात कधी उंदीर,तर कधी अन्य काही सापडण्याचे किळसवाणे प्रकार घडत आहेत. ऑनलाईन फूड मागवताना अनेकदा चिकन बिर्याणीला पसंद केले जाते. अनेक जण चिकन बिर्याणी ऑर्डर करुन निर्धास्तपणे खात असतात. परंतू एक अशी घटना घडली आहे की यापुढे असे पदार्थ मागवताना आपण शंभर वेळा विचार करु.

 

हे ताजे प्रकरण तेलंगाणा येथील खन्नम जिल्ह्यातील म्हटले जात आहे. खन्नम जिल्ह्यात एका व्यक्तीने झोमॅटोद्वारे चिकन बिर्याणी मागवली होती. ही चिकन बिर्यानी खात असताना त्यांना अशी वस्तू दिसली की ती पाहून त्यांना उलटीच आली. त्यांच्या बिर्याणीत चक्क झुरळ आढळले. यामुळे या ग्राहकाला प्रचंड धक्का बसला आहे.

 

श्रीनगर कॉलनीत निवासी मेडीसेट्टी कृष्णा नामक एका ग्राहकाने झोमॅटोवरुन ऑनलाईन बिर्याणी मागवली होती. ऑर्डर केल्यानंतर थोड्या वेळात त्यांचे पार्सल आले. त्यांनी झोमॅटोवरुन मागवलेली बिर्याणी खन्नम जिल्ह्यातील कोर्णाक रेस्टॉरंटमधून मागवली होती.

 

बिर्याणी खाताना दिसले झुरळ

मेडीसेट्टी कृष्णा हे त्यांच्या कुटुंबासह चिकन बिर्याणी वाढून घेतली, थोडी खाल्ल्यानंतर त्यांच्या नजरेला बिर्याणीतील झुरळावर पडली.त्यानंतर त्यांनी झोमॅटोकडे चौकशी केली की बिर्याणीचे पार्सल कुठून आले तर कार्णाक हॉटेलचे ते पार्सल होते.

 

रेस्टॉरंटच्या मॅनेजरला तक्रार

मेडीसेट्टी कृष्णा यांनी कोणार्क रेस्टॉरंटचा पत्ता शोधून काढला आणि तेथे जाऊन त्यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरकडे बिर्याणीत झुरळ असल्याची तक्रार केली. त्यावेळी रेस्टॉरंटने येथील वस्तू स्वच्छ असतात असा दावा केला. तसेच त्यांनी मेडीसेट्टी कृष्णा यांना पैसे परत करण्याची तयारी दाखवली.

 

तक्रारीला दाद नाही

पीडीत कृष्णा यांनी म्हटले आहे की जर कॉकरोच वाल्या बिर्याणी काही झाले असते. कुटुंबाची तब्येत बिघडली असती तर त्याला जबाबदार कोण ? बिर्याणीत झुरळ सापडल्याची तक्रार करुनही त्यांनी नीट उत्तर दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे अशा निष्काळजीपणा कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -