Friday, February 20, 2026
Homeब्रेकिंग26.5 लाखांच्या गुटख्यासह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

26.5 लाखांच्या गुटख्यासह 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

औरवाड (ता. शिरोळ) येथे कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची वाहतूक करणारे दोन टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले. या कारवाईत 26 लाख 64 हजार 200 रुपये किमतीचा गुटखा, दोन टेम्पो आणि इतर साहित्य असा एकूण 32 लाख 74 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी सचिन बाबन कोळी (वय 23) व महेश शिवाजी कोरवी (28, दोघे रा. रुई, ता. हातकणंगले) या दोघांना अटक करण्यात आली. कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 

शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने औरवाड येथील गणेशवाडी रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांनी टेम्पो (एमएच 51. सी 0981) आणि (एमएच 51 सी. 0811) अडवून तपासणी केली असता टेम्पोत सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 26 लाख 64 हजार 200 रुपये इतकी आहे. रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार ज्ञानू कुंभार, सागर माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -