Monday, October 7, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात ओमायक्रॉनची एन्ट्री; एक बाधित सापडल्याने खळबळ

कोल्हापुरात ओमायक्रॉनची एन्ट्री; एक बाधित सापडल्याने खळबळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर शहरामध्ये बुधवारी दुपारी ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. शहरात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.

रुग्ण बाधित सापडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. ओमायक्रॉन बाधिताने कोठेही प्रवास केला नसल्याचे आढळून आले आहे. ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या ३ नमुन्यांपैकी एकाला ओमायक्रॉन व अन्य दोघांना डेल्टा झाल्याचे आढळून आले.

आयटीआय परिसरातील राहणाऱ्या कुटूंबातील एका व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबातील ३ व्यक्तीचे स्वॅब कॉरोना चाचणीसाठी देण्यात आले.

या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे त्यांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी दि. २१ डिसेम्बर रोजी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविणेत आले होते. आज (ता.२९) दुपारी त्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एकाला ओमायक्रॉन तर दोन व्यक्तींना डेल्टा झाल्याचे आढळून आले. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची आरोग्य विभागामार्फत शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.

या सर्वांचे नमुने प्रथम कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात येतील. त्याचप्रमाणे रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -