Saturday, November 1, 2025
Homeमहाराष्ट्रडोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसाच्या निर्णयाचा थेट फटका, कंपन्या या देशात स्थलांतरच्या...

डोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसाच्या निर्णयाचा थेट फटका, कंपन्या या देशात स्थलांतरच्या तयारीत, अर्थव्यवस्थेला…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला एका मागून एक मोठे धक्के देताना दिसत आहेत. टॅरिफनंतर त्यांनी थेट H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारले. अमेरिकेत सर्वाधिक भारतीय नागरिक H-1B व्हिसावर जाऊन नोकऱ्या करतात. ज्यांच्याकडे अगोदरच H-1B व्हिसा आहे, त्यांना हे शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, जे नवीन लोक H-1B व्हिसासाठी अर्ज करत आहेत, त्यांना हे शुल्क भरावे लागेल. हा मोठा धक्का भारताला आहे. यासोबतच अमेरिकेच्या अनेक आयटी कंपन्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करावी, याकरिता भारतावर दबाव टाकण्याचे काम अमेरिका करत आहे. ऑगस्ट महिन्यापेक्षा जास्त सप्टेंबर महिन्यात भारताने रशियाकडून तेल खरेदी केलीये.

 

अमेरिकेने H-1B व्हिसाच्या शुल्कात बदल केल्याने नवीन अर्ज करणारे लोक संकटात सापडली. आयटी कंपन्यांना देखील हा धक्का असून त्यांना भारतीय कर्मचाऱ्यांना कामासाठी अमेरिकेत आणणे म्हणजे मोठा खर्च आहे. आता या काळात एक देश भारताच्या मदतीला धावून आलाय. भारतीय H-1B व्हिसा धारकांसाठी त्यांनी त्यांच्या देशाचा रस्ता खुला केला आहे. आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कुशल भारतीय कामगारांचे आम्ही आमच्या देशात स्वागत करू असे कॅनडाने स्पष्ट म्हटले.

 

कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट म्हटले की, आम्ही भारतीय कुशल कामगारांचे आमच्या देशात स्वागत करू जे डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या H-1B व्हिसामुळे त्रस्त आहेत. कॅनडाचे विदेश मंत्री हे ऑक्टोबर महिन्यात भारताच्या दाैऱ्यावर आहेत. मागील दोन वर्षांपासून भारत आणि कॅनडामध्ये तणाव बघायला मिळाला.

 

आता कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देत भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी पाऊस उचलले आहे. यासोबतच चीनने देखील अमेरिकेच्या H-1B व्हिसानंतर त्यांच्या व्हिसामध्ये मोठे बदल केले. आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय लोकांसाठी चीनने एक पाऊल पुढे टाकले. कार्नी यांनी म्हटले की, हे स्पष्ट आहे की, ही एक मोठी संधी आहे, ज्यांना यापूर्वी H-1B व्हिसा मिळाला होता. ज्यांना अमेरिकेत नोकऱ्या करायच्या होत्या, त्यांना आता ते मिळू शकत नाही.

 

हे कुशल लोक कॅनडासाठी मोठी संधी आहेत. लवकरच आम्ही यावर प्रस्ताव आणू. अमेरिकेच्या H-1B व्हिसावर तब्बल 77 टक्के भारतीय लोक काम करतात. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर मोठा धक्का अनेकांना बसला. आता भारताच्या H-1B व्हिसा धारकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत कॅनडा असून त्यांचे म्हणणे आहे की, H-1B व्हिसा धारकांनी कॅनडात येऊन नोकऱ्या कराव्यात. आता यामुळे अमेरिकेतील मोठ्या आयटी कंपन्या कॅनडामध्ये स्थलांतरीत होण्याचेही संकेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -