Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रजयसिंगपुरात खळबळ: लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून

जयसिंगपुरात खळबळ: लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून

जयसिंगपूर शहरातील सुनील किसन पाथरवट (वय ३१) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी (दि.२१) रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मध्यरात्री घडली.

 

ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे परिसरासह शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मारेकरी पसार झाले आहेत.

 

या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. काही संशयितांशी चौकशी सुरू असल्याचे समजते.

 

पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, लवकरच आरोपीचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिक तपास करीत असून, खुनामागील पार्श्वभूमी समोर येणे बाकी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -