Sunday, October 26, 2025
Homeमहाराष्ट्रHSRP नंबर प्लेटबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, जाणून घ्या

HSRP नंबर प्लेटबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, जाणून घ्या

पुण्यात एचएसआरपी बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१९ पूर्वीच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. पुण्यात सुमारे २६ लाख वाहनांना ही प्लेट बसवायची आहे, पण आतापर्यंत केवळ नऊ लाख वाहनांनीच नोंदणी केली आहे.

 

त्यामुळे उर्वरित १७ लाख वाहनांना मुदतवाढ द्यावी लागणार का, हा प्रश्न आहे. एक डिसेंबरनंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथक कारवाई करणार आहे.

 

पुण्यात एचएसआरपी बसवण्यासाठी आतापर्यंत नऊ लाख वाहनांनी नोंदणी केली आहे. याचा अर्थ शहरात ३५ ते ४० टक्के वाहनांनाच ही नंबर प्लेट लागली आहे. परिवहन विभागाने एचएसआरपी बसवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, नंबर प्लेट बसवण्याचा वेग पाहता, पुढील दीड महिन्यात किती पुणेकर ही प्लेट बसवून घेतील, हा मोठा प्रश्न आहे. तसेच, सर्व वाहनांना एचएसआरपीसाठी आणखी किती वेळा मुदतवाढ द्यावी लागेल, हाही चिंतेचा विषय आहे.

 

 

ठळक मुद्दे

 

२६ लाख वाहनसंख्या

९,०८,६४६ नोंदणी झाली

८,९०,१८५ वेळ मिळाली

७,०२,३७३ नंबरप्लेट बसवली

२३० पुण्यात फिटमेंट सेंटरची संख्या

एक डिसेंबर नंतर वाहनांवर कारवाई होणार

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बसवणे बंधनकारक आहे. पुण्यात एकूण २६ लाख वाहनांना ही प्लेट बसवायची आहे. यासाठी एका कंपनीला काम दिले असून, त्यांचे काम सुरू आहे. मात्र, वाहनांची संख्या आणि एचएसआरपी नोंदणीसाठी मिळालेला कालावधी यांचे गणित जुळत नाही. डिसेंबर २०२४ पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पाचव्यांदा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मागील दहा महिन्यांत केवळ नऊ लाख वाहनांनी प्लेट बसवण्यासाठी नोंदणी केली आहे. राहिलेल्या १७ लाख वाहनांना प्लेट बसवण्यासाठी आणखी किती मुदतवाढ द्यावी लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

“दिलेली मुदत संपल्यावर एक डिसेंबरनंतर ‘एचएसआरपी’ नसणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथक कारवाई करील,” असे राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले. पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की, “नागरिकांनी २०१९ पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवून घ्यावी. इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात प्रतिसाद चांगला आहे. एक डिसेंबरनंतर नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -