हवामान विभागाने २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण २० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला.
राज्यात हवामान पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता असून २३ ऑक्टोबर रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासाठी २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पालघर – हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर – वादळी वारे व विजांसह पावसाचा अंदाज
घाटमाथा भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता
संपूर्ण विभागासाठी यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली – हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
बीड, नांदेड, लातूर, धाराशिव – विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
या चार जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट






