भारताचा माजी कर्णधार, स्टार फलंदाज आणि चाबूक फिल्डिंग करणाऱ्या विराट कोहली याने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इतिहास घडवला आहे. विराटने सिडनीत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
विराटने सिडनीत बॅटिंगने धमाका केलाच. विराटने नाबाद 74 धावांची खेळी केली. त्याआधी विराटने सामन्यातील पहिल्या डावात मोठी कामगिरी केली. विराटने एका टीम विरुद्ध सर्वाधिक कॅच घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला
विराटने सिडनीत मॅथ्यू शॉर्ट याचा कॅच घेतला. विराटने वॉशिंग्टन सुंदर याच्या बॉलिंगवर शॉर्ट याचा कॅच घेत विश्व विक्रमाला गवसणी घातली. विराट यासह एका संघाविरुद्ध सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला.
विराटने शॉर्टनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कूपर कोनोली याचाही कॅच घेतला. विराटची ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही 78 वी कॅच ठरली. विराटने यासह स्टीव्हन स्मिथ याचा कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ याने इंग्लंड विरुद्ध 76 कॅचेस घेतल्या आहेत. तसेच श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने याने इंग्लंड विरुद्ध 72 कॅचेस घेतल्या होत्या.






