Tuesday, December 16, 2025
Homeक्रीडाट्रेडिंग विंडोमध्ये मोठा धमाका! शमीने सनरायझर्स हैदराबादला ठोकला रामराम, आता 'या' संघात...

ट्रेडिंग विंडोमध्ये मोठा धमाका! शमीने सनरायझर्स हैदराबादला ठोकला रामराम, आता ‘या’ संघात दाखल

आयपीएल २०२६ साठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. आगामी हंगाम सुरू होण्यास अजून वेळ असला तरी, खेळाडूंच्या रिटेन्शन यादीची अंतिम मुदत (१५ नोव्हेंबर) आता काही तासांवर आली आहे.

 

या दरम्यान, संघांमध्ये आपापसात ‘ट्रेडिंग’ सुरू आहे. अनेक खेळाडूंच्या अदलाबदलीची चर्चा असली तरी, शार्दुल ठाकूरच्या ट्रेडची अधिकृत घोषणा झाली आहे.

 

आता रिटेन्शनपूर्वी आणखी एका मोठ्या खेळाडूचा ट्रेड झाला आहे. तो खेळाडू म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या शमीने आता या संघाशी असलेले नाते तोडले आहे.

 

मोहम्मद शमी आता लखनऊचा ‘सुपर जायंट्स’ –

 

मोहम्मद शमी दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात परतण्यासाठी संघर्ष करत होता. त्याने आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेतला आणि विकेट्सही घेतल्या. मात्र, त्याची भारतीय संघात निवड झाली नाही. अशात त्याला आयपीएलमध्ये नवीन संघ मिळाला आहे. सनरायझर्स हैदराबादने मोहम्मद शमीला लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोबत ट्रेड केले आहे. म्हणजेच, आयपीएलच्या आगामी हंगामात शमी लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल.

 

मोहम्मद शमी हा ‘कॅश ट्रेड’ –

 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमीचा हा ट्रेड कोणत्याही खेळाडूच्या बदल्यात झालेला नाही. याचा अर्थ लखनऊ सुपर जायंट्सकडून कोणताही खेळाडू सनरायझर्स हैदराबादला दिला जाणार नाही. हा ट्रेड ‘कॅश ट्रेड’ आहे. विशेष म्हणजे याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकर आयपीएल आणि एलएसजी संघ निवेदन जारी करुन माहिती देतील.

 

सनरायझर्स हैदराबादने शमीला १० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.

बेस प्राईज २ कोटी रुपये असूनही, SRH ने त्याला मोठी किंमत दिली होती.

आता लखनऊ सुपर जायंट्स (LSG) देखील SRH ला तेवढीच रक्कम देईल, जी SRH शमीला देत होती.

 

मोहम्मद शमीची आयपीएल कारकीर्द –

 

मोहम्मद शमी यापूर्वी दिल्ली, गुजरात टायटन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांसारख्या संघांसाठी आयपीएल खेळला आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये तो केकेआरकडून (KKR) खेळला होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत ११९ सामने खेळलेल्या शमीने १३३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकोनॉमी ८.६३ असून सरासरी २८.१८ आहे. आता नवीन संघात शमी कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -