Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरपंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित; तेरवाडला मृत माशांचा खच

पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित; तेरवाडला मृत माशांचा खच

तेरवाड (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदी मध्ये पुन्हा रासायनिक पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडले. उद्योगधंद्याचे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्याने पाण्याला उग्र वास येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पंचगंगा नदी मध्ये काही शहरांतील सांडपाणी तसेच उद्योगांचे विनाप्रक्रिया सोडलेले रसायनयुक्त सांडपाणी यामुळे प्रदूषणाचा फटका बसतो.

दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचा दरवाजा अचानक खुला झाल्याने नदीपात्रात वाहते पाणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे काही उद्योजकांनी रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात सोडल्याचे समजते. त्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर तेरवाड बंधार्‍यात येऊन अडकल्याने येथे मृत माशांचा खच पडला आहे.पाण्याला फेस येत असून मृत माशांमुळे उग्र वास येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -