Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर येथे गरिबांना फक्त ५ रुपयांत मिळते व्हेज-नाॅनव्हेज जेवण

कोल्हापूर येथे गरिबांना फक्त ५ रुपयांत मिळते व्हेज-नाॅनव्हेज जेवण

टाळेबंदीच्या काळात कोल्हापूर शहरात केवळ ५ रुपयांत सकस आहार देऊन गोरगरिबांच्या पोटाची सोय करणारी ‘उत्तरेश्वर थाळी’चं  कौतुक राज्य, देश आणि देशाबाहेर झालेलं आहे. कोरोना आणि टाळेबंदी शिथील झाली. पण, थाळी बंद झाली नाही. आजही ‘मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून अविरतपणे उत्तरेश्वर थाळी गरिबांच्या मुखापर्यंत पोहोचविण्याचं अविरतपणे सुरू आहे. दानशूर लोकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचलं आहे आणि विविध स्तरातून मदतीचा ओघ वाढू लागला आहे.

सध्या शहरातील सधन कुटुंबातील लोक घरातील आनंद सोहळ्यानिमित्ताने ट्रस्टकडे येताहेत आणि आर्थिक मदतीचा हात देऊ करताहेत. घरातील सणवार, धार्मिक विधी, वाढदिवस, लग्नसमारंभ, जावळ, आप्तस्वकियांच्या स्मृतीदिनानिमित्ताने संबंधित कुटुंबातील प्रमुख मंडळी सर्वांच्या संमतीने ‘मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या कार्यकर्त्यांकडे संपर्क साधतात आणि १००० रुपयांपासून अगदी २ लाखांपर्यंतची मदत दिली जात आहे. त्यातूनही ट्रस्टला आर्थिक मदत होते आणि गरिबांच्या उत्तरेश्वर थाळी वाटपाचं कामं व्यवस्थित सुरू राहत आहे. इतकंच नाही इतक्या कमी पैशांत दर्जाही टिकून आहे.

मोबदल्याची अपेक्षा न करता ‘ते’ कार्यकर्ते पुरवताहेत सेवा 

उत्तरेश्वर थाळी आता गरीबांच्या आणि गरजूंच्या पोटाची सोय करणारी ठरली आहे. त्याच्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. त्यातूनच ट्रस्टच्या कामाला हातभार म्हणून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अनेक जण काम करताहेत. ज्यांना ट्रस्टला मदत करायची आहे. पण, आर्थिक परिस्थिती नाही. ते लोक दररोज येऊन जेवण वाटपामध्ये आपल्या कामाचा वाटा उचलत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -