Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्र2026 मध्ये जगावर महासंकट, बाबा वेंगा यांचं हादरून सोडणारं भाकीत समोर, जगभरात...

2026 मध्ये जगावर महासंकट, बाबा वेंगा यांचं हादरून सोडणारं भाकीत समोर, जगभरात खळबळ

जेव्हा -जेव्हा प्रसिद्ध भविष्यवेत्त्यांचं नाव घेतलं जातं, त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आधी येतं. बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं जगप्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबद्दल जी काही भविष्यवाणी केली होती, त्यातील अनेक गोष्टी या खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. दरम्यान आता नवं वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. लवकरच 2026 या वर्षाला सुरुवात होणार आहे, बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात देखील अनेक भाकीतं केली आहेत. बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात काही हादरवून सोडणाऱ्या भविष्यवाणी केल्या आहेत. 2026 मध्ये जगभरात युद्धाची स्थिती राहील, युद्धामुळे जगात मोठं नुकसान होईल, एआयची (AI) वाढत असलेली ताकद जगासाठी एक मोठं आव्हान ठरेल अशी अनेक भाकीत बाबा वेंगा यांनी 2026 संदर्भात केली आहेत. तसेच त्यांनी तिसऱ्या महायुद्धाबद्दल देखील मोठी भविष्यवाणी केली आहे.

 

बाबा वेंगा यांचा जन्म 1911 साली बग्लेरियामध्ये झाला, बाबा वेंगा यांनी दुसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती, आणि हे भाकीत खरं ठरल्यानं त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. बाबा वेंगा यांचा मृत्यू 1996 मध्ये झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील हजारो वर्षांचं भाकीत करून ठेवलं आहे. बाबा वेंगा यांनी केलेल्या प्रसिद्ध भाकीतांमध्ये हिटलरचा मृत्यू, ब्रिटनच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला आणि जपानमध्ये आलेली त्सुनामी अशा काही महत्त्वाच्या भाकीतांचा समावेश आहे, त्यामुळे आता 2026 बद्दल बाबा वेंगा यांनी जी भविष्यवाणी केली आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

2026 बद्दल बाबा वेंगा यांनी नेमकं काय म्हटलंय?

2026 बाबत बाबा वेंगा यांनी काही हादरवणारे भाकीतं केली आहेत. 2026 मध्ये काही मोठी नैसर्गिक संकट जगावर येतील. जगातील अनेक भागांना भूकंप, ज्वालामुखी, महापूर अशा संकटांचा सामना करावा लागेल. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होईल. जगातील एकूण भू भागापैकी 11 ते 12 टक्के भू भागाला याचा मोठा फटका बसेल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.

 

दरम्यान बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीमधून तिसऱ्या महायुद्धाचे देखील संकेत दिले आहेत, अमेरिका आणि रशियामध्ये मोठी लढाईल होईल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे. तसेच जगावर याच काळात एलिअनचा हल्ला देखील होऊ शकतो असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. चीन हा अमेरिकेला मागे टाकून मोठी महासत्ता म्हणून उदयास येईल असं भाकीत देखील बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -