Tuesday, December 2, 2025
Homeयोजनानोकरीकोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे...

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने भरती जाहीर केली आहे. फॅकल्टी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी www.centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याजवळ आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियाने रीजनल ऑफिस होशांगाबाद आणि बैतूल येथे भरती जाहीर केली आहे. सेंट्रल बँकेने सामाजिक उत्थान अवम प्रशिक्षण संस्था यासाठी भरती जाहीर केली आहे. ही बँकेची नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

 

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी (Central Bank Jobs Without Exam)

 

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट वाहू नका. त्याआधीच अर्ज करावेत.

 

सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी २२ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतत. या नोकरीसाठी अर्ज करताना कोणतेही शुल्क भरायचे नाहीत.

 

पात्रता (Eligibility)

 

प्रादेशिक कार्यालयात प्राध्यापक पदासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. विज्ञान, वाणिज्य कला यापैकी कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केलेले असावी. दरम्यान, MSW/MS रूरल डेवलपमेंट/ सोशियोलॉजी/ साइकोलॉजी/बीएससी वेटरनरी/हॉर्टिकल्चर/बीएससी अॅग्रो मार्केटिंग करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कॉम्प्युटर नॉलेज असायला हवे. याचसोबत स्थानिक भाषा यायला हवी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -