‘शोले’ या आयकॉनिक चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. ५० वर्षांपूर्वीचा हा चित्रपट आजही टीव्हीवर मोठ्या उत्साहाने प्रेक्षक पाहत असतात.या चित्रपटातील वीरू अर्थात धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ‘शोले’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रिलीज करण्यात आला. रिलीजनंतर या सिनेमाने किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
‘शोले’ 4K अल्ट्रा हाय डेफिनिशन (UHD) क्वालिटीमध्ये रिस्टोर केला आहे. ५० वर्षे जुना चित्रपट आता अत्यंत क्लियर व चांगल्या पिक्चर क्वालिटीसह प्रेक्षक पाहू शकतात. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा क्लासिक कल्ट चित्रपट ‘शोले’ची पहिल्या दिवसाची कमाई लाखांमध्ये आहे.
‘शोले’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांचा ‘शोले’ (Sholay: The Final Cut) हा चित्रपट शुक्रवारी पुन्हा प्रदर्शित झाला. या सिनेमात चाहत्यांना दिवंगत धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर पाहता आलं. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हा सिनेमा रिलीज झाल्याने त्याबद्दल प्रेक्षक उत्सुकता होती. रमेश सिप्पी दिग्दर्शित धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा ‘शोले’ हा चित्रपट शुक्रवारी 4K व्हर्जनमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. रिपोर्टनुसार, ‘शोले: द फायनल कट’ने पहिल्या दिवशी ३० लाख रुपये कमावले आहेत.
बऱ्याच बदलांसह रिलीज झाला ‘शोले’
‘शोले’ बऱ्याच बदलांसह पुन्हा रिलीज करण्यात आला. जय-वीरूच्या जोडीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवलं. ५० वर्षांपूर्वी पुन्हा मोठ्या पडद्यावर शोले पुन्हा रिलीज झाला. त्यामुळे प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
‘किस किसको प्यार करूं २’ चे कलेक्शन
नुकताच प्रदर्शित झालेला रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’ चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करतोय. याचदरम्यान या शुक्रवारी आणखी काही चित्रपट प्रदर्शित झाले. कपिल शर्माचा विनोदी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं २’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कपिलच्या बहुचर्चित ‘किस किस की प्यार करूं’ चा सिक्वेल आहे. पण हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘किस किसको प्यार करूं २’ ने पहिल्या दिवशी फक्त १.७५ कोटींची कमाई केली. पण, चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन अद्याप कळू शकलेले नाही.





