येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचापंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय.
पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला.
अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या १९ डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. असा दावा चव्हाणांनी केला. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं.




