Friday, January 30, 2026
Homeतंत्रज्ञानआता जिओचे सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी करा फक्त 44 रुपयांचे रिचार्ज, अशी आहे...

आता जिओचे सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी करा फक्त 44 रुपयांचे रिचार्ज, अशी आहे ट्रिक

टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज योजनांचे दर सातत्याने वाढत असताना केवळ 44 रुपयांत सिम कार्ड पूर्ण वर्षभर अ‍ॅक्टिव्ह ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा उपाय फक्त सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठीच उपयुक्त असून, या कालावधीत तुमचा मोबाईल नंबर कंपनीकडून बंद करून दुसऱ्याला दिला जाणार नाही.

 

यामुळे इनकमिंग कॉल्स आणि ओटीपी मिळत राहतील, मात्र या पद्धतीने आऊटगोईंग कॉल करता येणार नाहीत. अतिरिक्त किंवा सेकंडरी नंबर फक्त अ‍ॅक्टिव्ह ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपाय फायदेशीर मानला जातो.

 

विशेष म्हणजे, केवळ 44 रुपयांत जिओ सिम वर्षभर अ‍ॅक्टिव्ह ठेवणे शक्य आहे. साधारणपणे जर जिओ नंबरवर 90 दिवसांपर्यंत कोणतेही रिचार्ज झाले नाही, तर कंपनी नंबर बंद करून दुसऱ्या ग्राहकाला देऊ शकते. त्यामुळे अनेक जणांना अनिच्छेने महागडे रिचार्ज करावे लागतात. मात्र 44 रुपयांत वर्षभर नंबर चालू ठेवण्याची सोपी युक्ती उपलब्ध आहे आणि त्यातून इनकमिंग कॉल्स व ओटीपी मिळत राहतात.

 

जिओच्या नियमांनुसार, 90 दिवसांच्या आत एकदातरी रिचार्ज झाले, तर नंबर बंद केला जात नाही. यासाठी केवळ 11 रुपयांचा डेटा पॅकपुरेसा ठरतो. या पॅकसाठी कुठल्याही बेस प्लॅनची गरज नसल्याने नंबर सक्रिय ठेवण्यासाठी हा स्वस्त पर्याय मानला जातो.

 

11 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 1 तासासाठी 10GB हायस्पीड इंटरनेट मिळते. त्याचबरोबर हा रिचार्ज नंबर सक्रिय असल्याचे दर्शवतो आणि पुढील 90 दिवसांसाठी नंबर सुरक्षित राहतो. अशा प्रकारे वर्षभर सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी वर्षात फक्त 4 वेळा 11 रुपयांचा रिचार्ज करावा लागतो, म्हणजे एकूण खर्च फक्त 44 रुपये.

 

या पॅकद्वारे:

नंबर पुढील 90 दिवस बंद होत नाही

इनकमिंग कॉल्स आणि ओटीपी सातत्याने मिळत राहतात

बेस प्लॅनची आवश्यकता नसते

 

असे असले तरी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. दरवेळी 11 रुपयांचा रिचार्ज झाल्यानंतर पुढील रिचार्ज 90 दिवसांच्या आतकरणे आवश्यक आहे. तसेच रिचार्जनंतर काही डेटा प्रत्यक्ष वापरणेही महत्त्वाचे आहे, जेणेकरून नंबर वापरात असल्याची नोंद कंपनीकडे राहील. म्हणजेच ज्यांना जिओ सिम केवळ अतिरिक्त नंबर म्हणून ठेवायचा आहे, ते फक्त 44 रुपयांत आपला नंबर वर्षभर सुरळीतपणे ॲक्टिव्ह ठेवू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -