Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रप्रेयसीवर टीका केल्यानंतर तरुणाची हत्या, 5 आरोपींना अटक

प्रेयसीवर टीका केल्यानंतर तरुणाची हत्या, 5 आरोपींना अटक

शनिवारी रात्री उशिरा, नागपूरच्या कळमना पोलिस स्टेशन हद्दीतील पार्वती नगरमध्ये, प्रेयसीबद्दल केलेल्या टिप्पणीवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. एका 22 वर्षीय तरुणावर रॉडने वार करून त्याची हत्या करण्यात आली, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले.

 

या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे आणि तरुणांमध्ये वाढत्या मद्यपान आणि हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मृताचे नाव ऋतिक सावनलाल पटले (22) असे आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आजरी-माजरी येथील पार्वतीनगर चौकात रात्री 11.30 वाजता घडली.

 

ऋतिक पटले त्याच्या घराबाहेर बसून त्याचा मित्र तनसू नागपुरेसोबत गप्पा मारत होता. जेव्हा त्यांचा ओळखीचा आरोपी आला आणि त्याने त्यांना दारू पिण्यास सांगितले. पैसे नसल्याने त्यांनी नकार दिला.आरोपी त्यांना त्याच्या बाईकवर बसवून बिनाकी मंगळवार काजी हाऊस चौकात घेऊन गेला तिथे तिघांनी मद्यपान केले.

 

नंतर आरोपी आणि ऋत्विक मध्ये पैशाला घेऊन वाद झाला. ऋत्विकने आरोपीच्या प्रेयसीवर टीका केल्यावर आरोपी संतापला आणि त्यांना तिथेच सोडून बाईक घेऊन निघून गेला. घरी आल्यावर आरोपीने आपल्या भावाला घडलेलं सर्व सांगितले. या वर आरोपीच्या भावाने ऋत्विकला शिवीगाळ केली. ऋत्विक आपल्या काही मित्रांसह पार्वती नगर चौकात गेले आणि वाद चिघडले. आरोपीच्या गटात आरोपीचे वडील, भावाने ऋत्विकला चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करत जखमी केले.ऋत्विकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

 

माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी ऋतिकला मृत घोषित केले . कळमना पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -