Tuesday, January 13, 2026
Homeमहाराष्ट्रचार दिवसांत चांदीची 19 हजारांची झेप; सोनेही दीड लाखाच्या उंबरठ्यावर!

चार दिवसांत चांदीची 19 हजारांची झेप; सोनेही दीड लाखाच्या उंबरठ्यावर!

गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या सराफ बाजारात सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा धमाका झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि वाढत्या मागणीमुळे सोन्या-चांदीच्या दराने सर्व जुने विक्रम मोडीत काढले.

 

विशेषतः चांदीच्या दरात शुक्रवारपासून 19 हजारांची वाढ झाल्याने गुंतवणूकदार व ग्राहकांचे डोळे विस्फारले आहेत.

 

शनिवारी (दि. 10) चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 48 हजार रुपयांवर होता. सोमवारी (दि. 12) हा दर 2 लाख 67 हजार रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. दोन दिवसांतील ही 19 हजार रुपयांची वाढ चांदीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक बाजारातील तुटवड्यामुळे चांदीने ही मजल मारली आहे.

 

सोन्याच्या दरातही आज मोठी वाढ नोंदवण्यात आली. दोन दिवसांपूर्वी 1,41,000 रुपयांवर असलेले 24 कॅरेट सोने सोमवारी 1,44,900 रुपयांवर (जीएसटीसह) पोहोचले आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 3,900 रुपयांची वाढ झाली असून आता सोने दीड लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -