Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रबंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी...

बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी घोषणा

ई केवाय न केलेल्या राज्यातील लाखो लाडक्या बहि‍णींना दिलासा देणारी (installment)बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून ई केवायसीची मुदत वाढवण्यात येणार असल्याचं समोर आले आहे. महायुतीमधील कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील लाडक्या बहि‍णींना ई केवायसीसाठी मुदतवाढ होणार असल्याचे वक्तव्य केलेय. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाला हिंगोलीमध्ये बोलताना मंत्री झिरवाळ यांनी ई केवायसीच्या मुदतवाढीवर वक्तव्य केलेय.

 

अपात्र महिलांना वगळण्यसाठी राज्य सरकारकडून ३१ डिसेंबरपर्यंत (installment)ईकेवायसीची मुदत दिली होती. पण मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांना ई केवायसी करता आली नाही, अथवा त्यामध्ये चूका झाल्या. त्यामुळे अनेक महिलांचा प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ बंद झाला.

 

राज्यभरातून यामुळे लाडक्या बहि‍णींच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे.(installment) धुळे, हिंगोली अन् भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात लाडक्या बहि‍णींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आता सरकारकडून लाडक्या बहि‍णींना मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे समजतेय. मंत्री नरहळी झिरवाळ यांनी मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. लवकरच यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -