Saturday, April 4, 2026
Homeमहाराष्ट्र…तोपर्यंत ‘लाडकी’च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

…तोपर्यंत ‘लाडकी’च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भारतीय महिलांना आत्तापर्यंत झाला आहे.(account) काही लाभार्थी महिलांना यामध्ये काही अडचणी आल्या होत्या. काहींना लाडक्या ई-केवायसी करता आली नव्हती. म्हणून पुन्हा ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये आता ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांनी आत्तापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली त्यांना पुढील हप्ता बॅंकेत कधी जमा होणार? असा प्रश्न पडला आहे. यावर महिला बालकल्याण विभागाच्या नव्या स्पष्टीकरणामुळे आता महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

 

लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे.(account) याने महिलांना स्वावलंबी बनवणं, तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा योजनेमागचा उद्देश आहे. पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेत ई-केवायसी अनिवार्य असल्यामुळे महिलांना याचा लाभ घेता येत नाहीये. याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या अटी. त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रखडलेले आहेत. महिलांना या योजनेचा लाभ होत नाहीये.

 

राज्य शासनाने हा लाभ इतरांपर्यंत पोहोचावा आणि इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रीया सुरु केली आहे. त्यामध्ये महिला लाभार्थीचा आधार क्रमांक, बॅंकेचे खाते, मोबाईल क्रमांक याची पडताळणी केली जाते. मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागात अडचणी येत आहेत. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, तांत्रिक त्रुट्या, आधार-बॅंक लिंक नसणे, ओटीपीत अडथळे अशा अडचणींमुळे महिला नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर ई- केवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. याचा शेवट ३१ मार्च असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -