Thursday, March 26, 2026
Homeमहाराष्ट्रबदललेल्या धोरणानंतर गोंधळ; इंधन टंचाईच्या अफवांनी वाढली मागणी

बदललेल्या धोरणानंतर गोंधळ; इंधन टंचाईच्या अफवांनी वाढली मागणी

पेट्रोल कंपन्यांनी आधी पैसे भरा, मगच पेट्रोल-डिझेलचा साठा देणार, असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही कमी क्षमतेच्या पेट्रोल पंपधारकांना वेळेत पैसे भरून नोंदणी करता आलेली नाही

 

त्यामुळे या पेट्रोल पंपधारकांना सोमवारी (ता. २३) इंधन मिळाले नाही. त्यामुळे हे पंप बंद होते.

 

मात्र, इंधन संपले, अशी अफवा समाज माध्यमांवरून पसरल्याने आज सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अचानक मागणी वाढल्याने वितरण व्यवस्थेवर ताण आल्याने काही पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. आखाती युद्धामुळे घरगुती गॅसच्या पुरवठ्यावर निर्बंध आले. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला होता.

 

हा गोंधळ संपतो तोपर्यंत सोमवारी (ता. २३) सायंकाळपासून पेट्रोल-डिझेलचा गोंधळ सुरू झाला. पेट्रोल-डिझेल पुरविणाऱ्या कंपन्यांनी धोरण १६ मार्चला बदलले. पूर्वी इंधनचा पुरवठा केली की, त्यानंतर पैसे दिले जात होते. त्यासाठी काही कालावधी निश्चित केला होता. मात्र, या व्यवहारात कंपन्यांचा नफा कमी झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.

 

त्यामुळे त्यांनी आधी पैसे भरून नोंदणी करा. मागणीप्रमाणे पुरवठा केला जाईल, असे धोरण स्वीकारले. याचा फटका लहान पेट्रोल पंपधारकांना बसला. त्यांच्याकडे आवश्यक तेवढी रोख रक्कम नव्हती. त्यात बँकांना सलग सुटी आली. त्यामुळे त्यांना नोंदणी करण्यास उशीर झाला. त्यामुळे ज्यांचा इंधनसाठा सोमवारी संपला त्यांना मंगळवारी इंधन मिळाले नाही. त्यामुळे ते पेट्रोल पंप बंद ठेवले. दरम्यान, सोमवारी (ता.२३) सायंकाळी पेट्रोलच्या किमती वाढणार, देशात इंधनाचा साठा मर्यादित, अशा अफवा समाज माध्यमांवरून पसरल्या.

 

त्यामुळे नागरिकांनी आज सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या. अचानक मागणी वाढल्याने काही पेट्रोल पंपांवरील इंधनाचा साठाही संपला. त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. रात्री उशिरापर्यंत पेट्रोलसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्याच होत्या. जिल्ह्यातील १५ पेट्रोल पंप बंद. पेट्रोल-डिझेल साठा न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील १२ ते १५ पेट्रोल पंप बंद होते. यामध्ये कागल, गारगोटी, बालिंगा या परिसरातील पेट्रोल पंप बंद असल्याने येथील नागरिकांनी महामार्गावरील तसेच शहरातील पेट्रोल पंपांवर गर्दी केली.

 

पेट्रोलची दरवाढ नाही

 

सध्या पेट्रोलचा दर १०४ रुपये २९ पैसे इतका आहे. डिझेलचा दर ९१ रुपये ४ पैसे असा आहे. २०२२ पासून हा दर कायम आहे. काही महिन्यांपूर्वी प्रीमियम, स्पीड पेट्रोलचे दर वाढले. पूर्वी या पेट्रोलसाठी ११३ रुपये मोजावे लागत होते. त्यात २ रुपयांची वाढ झाली. अद्याप पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिची पेट्रोल पंपांच्या व्यवस्थापनाने दिली.

 

वादावादीमुळे पेट्रोल पंप बंद

 

अचानक ग्राहक वाढल्याने पेट्रोल पंपांवर मनुष्यबळ कमी पडू लागले. त्यातून ग्राहक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद होऊ लागले. ग्राहकांकडून शिवीगाळ झाल्याने शहरातील काही पेट्रोल पंप बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. उमा टॉकीज पेट्रोल पंपावर ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला.

 

दोन लिटरच पेट्रोल

 

पेट्रोल पंपांवर सकाळी वाहनधारकांना मागेल तेवढे पेट्रोल मिळत होते. मात्र, गर्दी वाढत गेल्याने पेट्रोल पंपांच्या व्यवस्थापनाने केवळ २ लिटरच पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -