1 एप्रिल 2026 पासून देशभरातील डिजीटल पेमेंट करणाऱ्या यूजर्ससाठी एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी पेमेंट करण्यासाठी फोनपे, गूगल पे किंवा पेटीएम सारख्या यूपीआयअॅप्सचा वापर करत असाल तर नवीन नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने यूपीआयद्वारे केले जाणारे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. आता केवळ यूपीआय पिन एंटर करून व्यवहार पूर्ण होणार नाही. तर यूजर्सना आणखी काही प्रोसेस देखील फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पिनसह 2-स्टेप व्हेरिफिकेशन असणार गरजेचं
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने आजपासून लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक यूपीआय पेमेंट करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच आता व्यवहार करताना आधीसारखा यूपीआय पिन एंटर करण्यासोबतच यूजर्सना 2-स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावे लागणार आहे. 2-स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉकपैकी एखाद्या प्रोसेसचा समावेश असू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आता ऑनलाईन व्यवहार करताना यूजर्सना पिन एंटर करण्यासोबतच ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा फिर फेस अनलॉक सारखे 2-स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावे लागणार आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे.
फोनपे, गूगल पे, पेटीएम यूजर्सवर कसा होणार परिणाम?
असं सांगितलं जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या नवीन नियमाचा परिणाम फोनपे, गूगल पे, पेटीएम यूजर्सवर होणार आहे. कारण आता यूजर्सना व्यवहार करताना आणखी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे पेमेंट स्लो होण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या फोनमधील सर्व यूपीआय ॲप्स अपडेट करा, जेणेकरून नवीन सिस्टिम सुरळीतपणे आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करेल.





