एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून तुम्ही देखील या महिन्यात कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने खास तुमच्यासाठी भन्नाट ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
या ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किंमतीमध्ये कार खरेदी करु शकतात.
कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा’ वर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या कारवर एप्रिल महिन्यात 2.25 लाखांपर्यंतच्या रोख सवलतीसोबतच इतर ऑफर देण्यात येत आहे.
Maruti Grand Vitara पॉवरट्रेन
पॉवरट्रेन पर्यायांच्या बाबतीत, ग्रँड व्हिटारा ग्राहकांना तीन इंजिनचे पर्याय उपलब्ध करून देते. पहिला पर्याय म्हणजे 1.5 -लिटर पेट्रोल ‘माईल्ड-हायब्रिड’ इंजिन. याव्यतिरिक्त, ही SUV 1.5 -लिटर पेट्रोल ‘स्ट्रॉंग-हायब्रिड’ इंजिनसह देखील उपलब्ध आहे. शिवाय, ग्राहकांकडे ग्रँड व्हिटारा 1.5-लिटर पेट्रोल-CNG व्हर्जन खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
Maruti Grand Vitara मायलेज
मारुती सुझुकी ग्रँड व्हिटाराचे मायलेज, निवडलेल्या विशिष्ट इंजिन पर्यायानुसार बदलते. ARAI च्या आकडेवारीनुसार, पेट्रोल-मॅन्युअल व्हर्जन अंदाजे 21.11 किमी/लिटरचे मायलेज देते. पेट्रोल-ऑटोमॅटिक व्हर्जन सुमारे 20.58 किमी/लिटरचे मायलेज देते. स्ट्रॉंग-हायब्रिड (e-CVT) व्हर्जन 27.97 किमी/लिटरचे मायलेज देते. तर CNG व्हर्जन अंदाजे 26.6 किमी/किलोचे मायलेज देते.
Maruti Grand Vitara किंमत
ग्रँड व्हिटारा 9-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲम्बियंट लायटिंग आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्लेने सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, सुरक्षिततेसाठी यामध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग्जची सुविधा देण्यात आली आहे.





