भारताचा स्फोटक तरूण फलंदाज वैभव सूर्यवंशीला याला टीम इंडियाची लॉटरी लागली आहे. सरराईजर्स हैदराबादविरोधातील सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही.चाहते निराश झाले. पण आता त्याचासाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा पुढील T20 मालिकेचा भाग असू शकतो.सूर्यवंशीची निवड जूनमध्ये आयर्लंडविरोधात होणार्या T20 मालिकेसाठी होऊ शकते असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
आयर्लंडविरोधात T20 मालिकेत वैभव सूर्यवंशी?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातील दाव्यानुसार, वैभव सूर्यवंशी आगामी इंग्लंडविरोधातील व्हाईट बॉल मालिकेपूर्वी BCCI त्याला एक मोठा ब्रेक देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते आयर्लंडविरोधातील मालिकेत खेळेल असा दावा करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीआधारे हे वृत्त देण्यात आले आहे. त्यात वैभव सूर्यवंशीचे नाव सुद्धा दुसर्या खेळाडूसह यादीत घेतल्याचे म्हटले आहे.
सर्वात तरूण क्रिकेटपटू
वैभव सूर्यवंशी टीम इंडियात निवड होणारा सर्वात तरूण क्रिकेटर असेल. जर त्याला आयर्लंडविरोधातील T20 मालिकेत संधी मिळाली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटर असेल. यापूर्वी काही जणांना पदार्पणातच जागतिक क्रिकेट मैदानावर खेळण्याची संधी मिळाली असली तरी वैभव हा कमी वयाचा खेळाडू आहे.
वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार?
वैभव सूर्यंवंशीला ही संधी का दिल्या जाऊ शकते, असे अनेकांना वाटत आहे. तर त्याच्यामागे, त्याची स्फोटक खेळी आहे. सलामीलाच इतका स्फोटक फलंदाज उतरवल्यानंतर विरोधी संघावर मनोबल वाढवणे आणि मानसिक दबाव वाढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तो गेल्या एका वर्षापासून लाईमलाईटमध्ये आहे. सोबतच त्याची दमदार खेळी ही त्याची सर्वात मोठी उजवी बाजू आहे. IPL 2026 मध्ये दिग्गज गोलंदाजांची त्याने धुलाई केली आहे. IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत तो सर्वात पुढे आहे.
नियम काय सांगतो?
वैभव सूर्यवंशी हा राष्ट्रीय क्रिकेट संघात असावा अशी अनेकांची आग्रही मागणी आहे. आयपीएलमध्ये त्याने डोळ्याचे पारणे फेडणारी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी कमीत कमी 15 वर्षांचा खेळाडू हवा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा ऐन उमेदीच्या काळात पाकिस्तानविरोधात दमदार खेळी खेळली होती. आता वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे त्याला कारकिर्दीत अनेक विश्व विक्रम नोंदवण्याची संधी मिळेल.




