Monday, October 2, 2023
Homeकोल्हापूर40 टक्के बेड भरल्यास त्या जिल्ह्यात लॉकडाऊन

40 टक्के बेड भरल्यास त्या जिल्ह्यात लॉकडाऊन

 ज्या जिल्ह्यात उपलब्ध बेडपैकी 40 टक्के बेड कोरोना रुग्णांनी भरतील तेथे लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, राज्यात निर्बंध लावण्याबाबत उद्या, बुधवारी होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लावायचे की नाहीत, याचा निर्णय घेण्यासाठी उद्या मंत्रालयात कोव्हिड कृती दल  आणि राज्याच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीतच राज्यात निर्बंध लावायचा की नाही हे ठरेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्यातील रुग्णसंख्या वाढत चालली असली, तरी सध्या एकूण रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण हे केवळ चार जिल्ह्यांतील असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असेल तेथे लॉकडाऊनचा विषयच येणार नाही. रुग्णालयांतील एकूण बेडपैकी 40 टक्के बेड भरले, तर त्या जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात मंगळवारी सक्रिय रुग्णसंख्या 171 वर गेली. यापैकी 54 रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित 117 रुग्णांवर घरीच (होम आयसोलेशन) उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 994 खाटांची (बेड) उपलब्धता आहे. या एकूण उपलब्ध खाटांपैकी जिल्ह्यात

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र